भाजपतर्फे प्रा.संजय मंडलिकांच्या प्रचारार्थ शास्रीनगरमध्ये कार्नर सभा

कोल्हापूर /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा उपाध्यक्ष उमेश निरंकारी यांच्या पुढाकाराने शास्त्रीनगर चौक येथे प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी बोलताना प्रभागातील नगरसेवक नियाज खान यांनी या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान प्रा.संजय मंडलिक यांना देण्याचा निर्धार केला.या प्रसंगी भाजपा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे. नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक रूग्णांना विविध उपचार कमी खर्चामध्ये आणि तात्काळ मिळत आहेत. अशा पद्धतीच्या विवध लोकाप्रीत योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोचल्या आहेत त्यामुळेच जनसामान्यांचा आवाज मा.नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधान असाच आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी महायुतीचे उमेदवार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.भाजपा उपाध्यक्ष श्री राहुल चिकोडे म्हणाले नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पाच रुपयांत चपाती-भाजी, आडवाटेवरच कोल्हापूर, नवऊर्जा उत्सव, लहान मुलांसाठी मामाच्या गावाला जाऊया उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, राधानगरी येथे भरवलेला काजवा महोत्सव इत्यादी विविध समाजउपयोगी संकल्पनांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार कार्य केले आहे. त्याचबरोबर कला-क्रीडा, अध्यात्म, शैक्षणिक, आरोग्य विषयांवर देखील मोलाचे योगदान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला मेडिकल हब, टूरिजन हब, कोल्हापूर MIDC मध्ये विविध उद्योगधंदे आणून कोल्हापूरच्या अर्थचक्राला मोठी गती देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला महायुतीचे उमेदवार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव म्हणाले, भारत देशामध्ये वर्षानुवर्षे सर्व जाती धर्माचे लोक सुखाने नांदत असताना फक्त मताच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने काही विशिष्ठ जाती धर्माच्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. परंतु पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने विविध जनकल्याणकारी निर्णय घेऊन अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग भरून काढण्याचा पुरेपूर प्रत्यन केला. स्टार्टअप इंडिया, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना इत्यादीच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन देशाची सुरक्षा अबाधित ठेवून भारताच्या आंतर्गत भागामध्ये विकासाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरवर लादलेला टोल रुपी राक्षस दिलेल्या शब्दाप्रमाणे घालवला त्यामुळे आपल्याला विनंती करतो कि, प्रा.संजय मंडलिक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून कोल्हापूरचा बुलंद आवाज संसदेत पाठवावा.याप्रसंगी अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, नचिकेत भुर्के, रणजीत मिनचेकर या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी महादेव बिरजे, सुशांत गवळी, गणेश माळी, महेश आवळे, लक्षण आठवले, अक्षय जाधव, किशोर हुपरे विजय आगरवाल, शंतनू मोहिते, कृष्णा आतवाडकर, महादेव लोहार, राजू सासणे, संतोष माळी आदींसह प्रभागातील नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *