बी नॅचरलने केले ग्राहकांचे सबलीकरण – सादर केली पारदर्शक पेट बेव्हरेजेसची वैशिष्ट्यपूर्ण रेंज

४ मे २०१९: आयटीसी च्या फुड डिव्हिजनने आपल्या फ्रुट बेव्हरेजेसच्या बी नॅचरल रेंजतर्फे असेप्टिक पेट बॉटल्समध्ये मिळणाऱ्या देशातील पहिल्या अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेल्या प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेससह अजून एका क्रांतिकारक उत्पादन रेंजची घोषणा केली. गेल्या वर्षी ब्रँडने आपल्या फ्रुट बेव्हरेज पोर्टफोलियोच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केला. बी नॅचरलची संपूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून ती भारतीय शेतकऱ्यांकडून मागवलेल्या भारतीय फळांपासून तयार केली आहे.या विभागात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने सादर करण्याच्या आपल्या निर्धाराला धरून या ब्रँडने भारतातील पहिली पॅकेज्ड अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेली प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेस पर्यावरणस्नेही रिसायकल करण्यासारख्या असेप्टिक पेट बॉटल्समध्ये सादर केली आहेत. या सादरीकरण प्रसंगी आयटीसी लिमिटेडच्या डेअरी आणि बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल आणि ब्रँड अॅम्बेसेडर शिल्पा शेट्टी कुंद्रा उपस्थित होते.भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेल्या लाँच रेंजमध्ये हिमालयन मिक्स्ड फ्रुट, रत्नागिरी अल्फॉन्सो आणि दक्षिण पिंक गुआवा यांचा समावेश आहे. ही फ्रुट ज्युसेस हिमालय, रत्नागिरी आणि दक्षिण कर्नाटक येथील फळांपासून तयार करण्यात आली आहेत. ही रेंज सर्व मॉडर्न ट्रेड आणि जनरल ट्रेड (किराणा दुकानांमध्ये) उपलब्ध असतील.या सादरीकरणाच्या वेळी आयटीसी लिमिटेडच्या डेअरी अँड बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल म्हणाले, ही प्रोडक्ट रेंज वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतीय फ्रुट बेव्हरेज उत्पादनांमध्ये उपलब्ध नसलेली अशी ही प्रोडक्ट रेंज आहे. सध्याचे ग्राहक आरोग्याबाबत सजग आहेत आणि पॅकेज्ड उत्पादनांमध्ये काय आहे, ते त्यांना जाणून घ्यायचे असते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा हा बी नॅचरलचा गाभा आहे. या गाभ्याला धरूनच आम्ही प्रीमिअम भारतीय फळांपासून तयार केलेली आणि असेप्टिक पेट बॉटल्स हे सर्वात आधुनिक सुरक्षित तंत्र वापरून पॅकेज केलेली फ्रुट बेव्हरेजेसची रेंज सादर करत आहोत. या रेंजमध्ये कोणतेही अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नाहीत याची खातरजमा केलेली आहे. ही पूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून भारतीय शेतकऱ्यांकडून घेतलेल्या फळांपासून तयार केली आहे, याचा आयटीसी बी नॅचरलमध्ये आम्हाला अभिमान आहे.अभिनेत्री आणि वेलनेस प्रचारक शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणाल्या, “भारतीय ग्राहकांसाठी फ्रुज ज्युस उपभोगण्याच्या अनुभवाला अधिक सकारात्मक आकार देण्यासाठी बी नॅचरलतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल मी आनंदी आहे. आई म्हणून मला माझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम उत्पादने हवी असतात, म्हणून आम्हाला विश्वासार्ह ब्रँड हवे असतात. आपल्या स्वत:बद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असलेल्यांसाठी हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे.”बी नॅचरलची फ्रुज ज्युसेस भारतीय शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या फळांपासून तयार केलेली असतात, त्या माध्यमातून भारतीय कृषी अर्थव्यवस्था बळकट करतात. भारताच्या फ्रुट सर्क्युलर इकोनॉमीला चालना देण्याच्या ब्रँडच्या निर्धाराला बळकटी देत पारदर्शक असेप्टिक पेट बॉटल्स रेंज ही उत्तम दर्जाच्या फुड प्लास्टिकपासून तयार करतात, जे रिसायकलिंग सुविधांसाठी पूर्णपणे कम्पॅटिबल आहे.तीन ज्युस व्हेरिअंट्स सामान्य दुकानांमध्ये आणि मॉडर्न किराणा दुकानांमध्ये, अग्रणी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!