अवंती लर्निंग सेंटर चे एनईईटी , आयआयटी आणि मेडिकल मधे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३०० सेंटर्स सुरू

सांगली : एड-टेक स्टार्टअप अवंती लर्निंग सेंटर्स भारतातील विज्ञान आणि गणित शिक्षणाची रुपरेषा पूर्णपणे बदलत आहे. बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय झालेल्या त्यांच्या फिजिकल+डिजिटल मॉडेलचे हे यश आहे. नीट परीक्षेसोबतच आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा STEM विभागातील (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथमॅटिक्स) उच्च शिक्षणाचा पाया रचण्याचे काम मुंबईस्थित ही एज्युकेशन स्टार्टअप करत आहे. या संस्थेने नुकतीच ५० शहरे आणि नगरांमध्ये ३०० सेंटर्स सुरू करून भारतातील सर्वोत्कृष्ट मेडिकल आणि इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ५००,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे.

आयआयटी प्रवेश परीक्षेला ११.९ लाखांहून अधिक तर नीटसाठी १३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. अवंतीही आपल्या फिजिकल+डिजिटल मॉडेलसह विस्तारत आहे. अवंतीची शिक्षणपद्धती त्यांचे शैक्षणिक प्रमुख हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. एरिक मझुर यांच्या संशोधनावर आधारित आहे. फिजिटल मॉडेलवर भर देणाऱ्या, आर्टिफिशिअल इंटेलिजंटवर आधारित अॅडाप्टिव्ह लर्निंगसह अवंती गुरुकुल अॅपमुळे अवंती ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी एडटेक स्टार्टअप ठरली आहे.

अवंती लर्निंग सेंटर्सचे सह-संस्थापक अक्षय सक्सेना म्हणाले कि, “भारतातील सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. भारतात उत्कृष्ट शिक्षणासाठीचा पाया विस्तृत करण्यासाठी आम्ही आधुनिक डिजिटल उपक्रमांसोबत काम करत आहोत. अवंती हे लर्निंग अॅपसोबत असलेले एक एडटेक प्ले आहे. यात मशिन लर्निंग आणि एआयवर आधारित वैयक्तिक शिफारसी आहेत. तसेच हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. मझुर यांच्या संशोधनावर आधारित पद्धतींनुसार आखलेला उच्च दर्जाचा अभ्यासक्रम आणि वर्गांमध्ये पुरवले जाणारे उत्कृष्ट तंत्रज्ञान यांचीही जोड देण्यात आली आहे. घोकंपट्टीऐवजी अनुकूल शिक्षणावर भर देणे शक्य करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे, हेच आमचे वेगळेपण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *