Author: Satish Vanire

वंचित बहुजन आघाडीचे करवीर मधून डॉ. आंनदा गुरव तर दक्षिण मधून दिलीप कावडे निवडणूक रिंगणात

कोल्हापूर /प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर आंनदा गुरव तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बबनराव उर्फ दिलीप कावडे निवडणूक लढवणार असल्याच वंचित बहुजन आघाडीचे अनिल म्हमाने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वंचित […]

Continue Reading

रुग्ण हक्क परिषद उभारणार सर्व जिल्ह्यात गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल

कोल्हापूर /प्रतिनिधी खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद पुणे, गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करणार आहे. अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड. वैशालीताई चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ३५० बेडचे असून, पुणे याठिकाणी हे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. रुग्ण हक्क परिषद, पुणे ही एक आयएसओ नामांकन संस्था आहे. […]

Continue Reading

शिवसेनेने कधीही जातीयवाद केला नाही : परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते

कोल्हापूर /प्रतिनिधी  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्रित करून जातीय तेड नष्ट करण्याचा पायंडा पाडला. अनुसूचित जातीतील अनेक युवक, महिला शिवसेनेत येवून यशास गवसणी घालत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कोणताही जातीय मतभेद केला नाही आणि शिवसैनिकांना करू दिला नाही. त्यामुळे शिवसेना अनुसूचित जाती जमातीमधील बांधवांच्या पाठीशी ठाम उभी असून, […]

Continue Reading

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये अद्ययावत हृदय रोग विभाग कार्यान्वयीत

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगर मधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये नव्या व्यवस्थापनेखाली अद्ययावत उपचाराचा हृदय रोग विभाग कार्यान्वयीत झाला आहे. मुंबई सह देशातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचाराचा मोठा अनुभव पाठीशी असलेले डॉ युवराज पोवार हे या विभागाचे प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या “बीइंग डॉक्टर” या संकल्पनेवर आधारीत डॉ युवराज […]

Continue Reading

प्रसिध्द अभिनेते सनी देओल यांची मंजित माने यांनी घेतली सदिच्छा भेट: कोल्हापूरच्या कलांकारातर्फे दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर /प्रतिनिधी प्रसिध्द सिनेस्टार अभिनेते आणि खासदार सनी देओल यांची मुंबईमध्ये मंजित माने यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन त्यांना कोल्हापूरच्या कलाकारांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. सनी देओल यांचे चिरंजीव करण देओल यांचा नुकताच प्रसिध्द झालेला “पल पल दिल के पास” या सिनेमाचे प्रमोशन पार पडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुहास उगळे […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्ह्यात बहुजन मुक्ती पार्टी सर्व जागा स्वबळावर लढणार :जिल्हाध्यक्ष गौरव पणोरेकर

कोल्हापूर /प्रतिनिधी राज्यात दि.२१ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. दरम्यान बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष गौरव पणोरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रासह देशातील राजकारण तसेच शेतकरी आत्महत्या ,मराठा आरक्षण ,धनगर आरक्षण, ओबीसी जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, खाजगीकरण, ईव्हीएम आणि कोल्हापूर जिल्ह्यातील […]

Continue Reading

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करा : विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची सुविधा द्या. शांततेत, नि:पक्षपणे आणि पारदर्शी निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी […]

Continue Reading

दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ९ते१२ऑक्टोबर दरम्यान आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीच्या वतीने “प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार “या संकल्पनेवर आधारित दिं.९ते१२ ऑक्टोबर दरम्यान शाहू स्मारक भवन येथे दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवामध्ये प्रर्यावरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सन्मानाने गौरविलेले ३५ पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशी माहिती मित्र कोल्हापूर चे उदय गायकवाड आणि किर्लोस्कर ऑईल […]

Continue Reading

ब्रँड इम्पॅक्टमध्ये “विश्व ” ठरल बेस्ट कन्सल्टंट 

कोल्हापूर /प्रतिनिधी     नुकताच ब्रँड इम्पॅक्ट संस्थेकडून महाराष्ट्रातील विश्व मेडिकल अडमिशन पाँइटला बेस्ट एजुकेशन कन्सल्टंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.                                                                          […]

Continue Reading

शिवसेनेचे उद्या “प्रथम ती” महिला संमेलन

कोल्हापूर/प्रतिनिधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाबाबतच्या विचारातून प्रेरणा घेवून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून नव महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला सहभागासाठी “प्रथम ती” अभियानातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता राजर्षी शाहू […]

Continue Reading
error: Content is protected !!