Author: omkar

गणेश मुर्ती कारागीरांना नुकसान भरपाई मिळावी: मुर्तीकारांची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराचा सर्वच घटकांना मोठा फटका बसला.तर या महाप्रलयातून कुंभार समाजातील मुर्तीकार ही सुटले नाही. महापुरामुळे कुंभार समाजातील मुर्तीकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण कुंभार समाजातील मूर्तीकारांचा आर्थिक कणाच मोडला आहे. तर काही दिवसावर गणेशोत्सव येवून ठेपल्याने गणेश मूर्ती बनविणे या कारागीरांना अशक्य बनले आहे. महापुराच्या पाण्याखाली संपूर्ण कुंभार समाज असल्याने […]

Continue Reading

पूरग्रस्तांना घरे बांधून तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी:संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूरामुळे अनेक घरे उध्दस्त झालीत.तर हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने घरांची पडझड झालेल्या पूरग्रस्तांना घरे बांधून द्यावी.त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळवी.तसेच अशी पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सरकारशी योग्य समन्वय ठेवून अल्लमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा.अशी मागणी मराठा […]

Continue Reading

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

[शहरातील बापट कॅम्प परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप तर सीपीआर मधील पूरग्रस्त रुग्णांच्या विभागास देणार भेट : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती] कोल्हापूर /प्रतिनिधी शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करीता कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव […]

Continue Reading

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये भरीव वाढ करावी :आमदार राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या निवेदनाद्गवारे मागणी कोल्हापूर/प्रतिनिधी  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर यावर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. या जलप्रलयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाकडून या पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर केली आहे. परंतु, जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना सध्या देण्यात येणारी नुकसानभरपाई ही तुटपुंजी असल्याने यामध्ये भरीव वाढ करण्याची आवश्यकता आहे. या […]

Continue Reading

मराठा महासंघ चिक्कोडी शाखेतर्फे पुरग्रस्ताना मदत

कोल्हापूर/प्रतिनिधी मराठा महासंघाच्या वतीने पुरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा महासंघ तालुका चिक्कोडी येथून कोल्हापूर मधील पुरगस्त बांधवांसाठी मदत म्हणून मोठ्या प्रमाणत धान्य, कपडे (ज्वारी, गहू, तांदूळ, साड्या) आणून देण्यात आले. ही मदत शाहू स्मारक येथे सुरू असणाऱ्या पुरग्रस्त मदत, संकलन व वितरण केंद्र येथे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्याकडे जमा करण्यात आली. […]

Continue Reading

आजअखेर 375 गावांमधून 1 लाख 2 हजार 568 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 578 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : एकूण 375 गावांमधून 1 लाख 2 हजार 568 कुटुंबातील 4 लाख 7 हजार 578 व्यक्तींचे आजअखेर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी ओसरल्याने संक्रमण शिबीरातील पूरग्रस्थांनी आपल्या गावामध्ये मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यामुळे आज एकूण 26 संक्रमण शिबीरात 2 हजार 337 पूरग्रस्त आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी […]

Continue Reading

दादांच्या कामावर टीका म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट – महेश जाधव

कोल्हापूर दि.१७ माजी मंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी कमकुवत मनाने महसूल मंत्री तथा पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचेवर चुकीच्या पद्धतीने टीका केली आहे. अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केलेल्या आमदारांना शासकीय कार्यक्रमाची माहितीबाबत अनभिज्ञ असणे म्हणजे अकार्यक्षमतेचे लक्षण म्हणावे लागेल. मुश्रीफसाहेब झेंडावंदनाचे राजकारण करू नये असे संकेत असताना पूरग्रस्त दु:खात असताना त्यांच्या दु:खावर फुंकर […]

Continue Reading

‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्‍ये अलीला समजली जफरची दुष्‍ट योजना

सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ लक्षवेधक पटकथा आणि रोमांचक वळणांसह प्रेक्षकांना अचंबित करत आहे. मालिका पुन्‍हा एकदा प्रतिस्‍पर्धी जफरची (आमिर दळवी) सर्वात मोठी दुष्‍ट योजना उघडकीस आणण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहे. अली ऊर्फ अलाद्दिनचा (सिद्धार्थ निगम) कट्टर शत्रू जफरला पराभूत करण्‍याच्‍या त्‍याच्‍या प्रयत्‍नांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम व पाठिंबा […]

Continue Reading

डीएम ग्रुप बनलाय स्वच्छतादूत जिल्हाधिकारी कार्यालय केले चकाचक

कोल्हापूर:कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर शहरात निर्माण झालेले गाळाचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, महापुराबरोबर वाहून आलेला कचरा यामुळे संपूर्ण शहरच विद्रूप बनले. कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आज हजारो हात झटत आहेत, यामध्ये डीएम ग्रुपचे कर्मचारी स्वच्छता दूत म्हणून पुढे आले असून डीएम ग्रुपचे 260 कर्मचारी शहरातील विविध भागात स्वच्छता करत आहेत. सोमवार पासून सलग चार दिवस जिल्हाधिकारी […]

Continue Reading

गावगाडा उभा राहण्यासाठी कर्ज वाढले तरी चालेल – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

कोल्हापूर : ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे, अजून कर्ज झाले तरी चालेल पण गावगाडा उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका शासनाची आहे, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्यावरील पूरग्रस्तांच्या शिबीराला कृषीराज्यमंत्री श्री. खोत यांनी आज भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जयसिंगपूर नगराध्यक्ष […]

Continue Reading