अँस्टर हाँस्पिटलतर्फे पेशंटसाठी देशात अँस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ:रुग्णांना मिळणार बिनव्याजी कर्ज

कोल्हापूर/प्रतिनिधी
हाँस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना हाँस्पिटल व मेडिकलचे बील भरण्यास मोठी अडचण येत असते. तर हाँस्पिटल चा खर्च भागवण्यासाठी काही रुग्णांना कर्ज हवे असते. मात्र विविध ठिकाणी कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तर त्यांचे व्याजदरही मोठे असतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.पेशंटची हीच गरज ओळखून हाँस्पिटलमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर मदत देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ॲस्टर हाँस्पिटल तथा ॲस्टर डीएम हेल्थकेअर “च्या वतीने ॲस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटर” चा शुभारंभ देशात ५ राज्यामध्ये असलेल्या अँस्टर च्या ११ हाँस्पिटल व आगामी होणाऱ्या २ हाँस्पिटलमध्ये करण्यात आलाय.या माध्यमातून गरजू रुग्णांना बिनव्याजी अर्ज मिळण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती ॲस्टर हॉस्पिटल अँड क्लिनीक्स चे सीईओ डॉ. हरीश पिल्लई, आणि अँस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आझाद मूपेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अँस्टर फायनान्स सर्व्हिसेसमधून अँस्टर इझी केअर ही सेवा बजाज फिनसर्व्ह आणि फेडरल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलीय.ज्या माध्यामतून पेशंटला आर्थिक मदत/निधी पुरविला जाणार आहे. या मदतीची परतफेड ही समान मासिक हप्त्यांमध्ये (ईएमआय) १ वर्षाच्या कालावधीत केली जाऊ शकते. यावरील कर्जाच्या व्याजाचा भार ॲस्टर डीएम हेल्थकेअर उचलणार आहे. अचानकपणे उद्भवलेले आजारपण किंवा दुर्घटनांमुळे त्रस्त झालेल्या रुग्णांना ज्यांच्याकडे उपचारांसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसते त्यांना या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. गरजू रुग्णांना मदत करणारी ॲस्टर इझी केअर, ही योजना भारतातील काही ग्रुप हॉस्पिटलमध्ये चाचणी म्हणून सुरु करण्यात आली होती आणि या योजनेला सर्व रुग्णांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
तर क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म या सेवेच्या माध्यमातून आपल्याकडे असे अनेक रुग्ण आहेत की, ज्यांना ट्रान्सप्लांटसह इतर वैद्यकीय सेवा आणि उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असणार आहे. अशा रुग्णांना खात्रीशीरपणे आणि प्रामाणिकपणे मदत करणारे क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म आहेत. ज्यांना वैद्यकीय सेवा परवडणार नाहीत अशा रुग्णांच्या मदतीसाठी डीएम हेल्थकेअर गेल्या ५ वर्षांपासून मिलाप, इम्पॅक्ट गुरू अशा क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मसह काम करत आहे.
याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पात्र रुग्णांना मोलाची अशी आर्थिक मदत मिळते. या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे आजारपण आणि संबंधित फोटोंच्या प्रमाणासह प्रमाणित वैद्यकीय रेकॉर्ड नेटवर अपलोड करून मदतीचे आवाहन केल्यानंतर जगभरातील अनेक दयाळू व्यक्तींकडून या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच धर्मादाय या सेवेच्या माध्यमातून ॲस्टर डीएम फाऊंडेशन आणि डॉ. मुपेन कौटुंबिक फौंडेशनद्वारे गरजू आणि गरीब रुग्णांना उपचारांसाठी अंशिक किंवा पूर्ण रक्कमेची मदत केली जाते. ती मदत आता ॲस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे.ॲस्टर वॉलंटीयर्स ग्लोबल प्रोग्राम जी ॲस्टर डीएम हेल्थकेअरची (CSR) शाखा आहे, तिच्या माध्यामतून देखील गरजू रुग्णांना निधी पुरवण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य स्त्रोत वापरले जाणार आहेत.
ही सेवा देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲस्टर मेडिसिटी कोच्चि, ॲस्टर एमआयएमएस कालिकट, ॲस्टर एमआयएमएस कोट्टाक्कल, ॲस्टर सीएमआय हॉस्पिटल बेंगलुरू, ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर, ॲस्टर प्राइम हॉस्पीटल, हैदराबाद, ॲस्टर रमेश हॉस्पिटल गुंटूर, ॲस्टर रमेश हॉस्पिटल, विजयवाडा, ॲस्टर रमेश हॉस्पिटल एम.जी रोड, ॲस्टर रमेश हॉस्पिटल ओंगोल , डीएम वाईएमएस, वायनाड आणि ग्रुपची आगामी दोन रुग्णालये- ॲस्टर हॉस्पिटल कन्नूर आणि ॲस्टर आर.व्ही हॉस्पिटल बेंगलुरू यांचा समावेश असणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आझाद मूपेन म्हणाले, “आमच्या रुग्णालयातील रुग्णांच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी ॲस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटर ही सेवा आम्ही सुरु कली आहे. भारतात प्रथमच कोणत्याही इतर त्रासाशिवाय गरजूंना मदत करणारी ही एक खिडकी योजना सुरू केली जात आहे. आमच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर योग्य वैद्यकीय मदत मिळावी हा या योजनच्या पाठीमागील उद्देश आहे. व यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनेक सेवा पुरविल्या जातील”
या सेवेचे स्वरूप आणि प्रक्रिया समजावून सांगताना ॲस्टर हॉस्पिटल अँड क्लिनीक्स चे सीईओ डॉ हरीश पिल्लई म्हणाले की, “एकदा रुग्णाची आर्थिक गरज लक्षात आल्यानंतर रुग्णांचे कुटुंबिय किंवा स्वतः रुग्णाला एक सर्वसमावेशक अशा योजनेविषयी माहिती दिली जाईल ज्यामध्ये व्याजमुक्त कर्जापासून ते रुग्णाला मदत देणाऱ्या क्राऊड फंडिंग सारख्या अनेक नाविन्यपूर्ण सेवांचा समावेश असेल. भारतातील आमच्या वैदकीय सेवांद्वारे रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करणे हा याचा उद्देश आहे.
पत्रकार परिषदेला अँस्टर हाँस्पिटल मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोरे, डॉ. अमोल कोडोलीकर, भूलतज्ञ डॉ. उल्हास दामले, डॉ. शिवानंद अपराज,अमरसिंह भोसले उपस्थित होते.