सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न

कोल्हापूर ता.29 : महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांची मुख्याधिकारी म्हणून पुणे जिल्हयातील दौंड नगरपरिषदेत बदली झालेने आज त्यांचा छ.ताराराणी सभागृहत येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महालक्ष्मीची मुर्ती देऊन निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वणकुद्रे यांनी केले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, प्रा.फंड अधिक्षक उमाकांत कांबळे, एनयूएलएमचे विʉाास कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांनी बोलताना आपण आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमामुळे माझे मन भरुन आले. आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला धन्य मानतो. त्यांच्याकडून शिकलेल्या कामकाजाच्या कार्यपध्दतीमुळे मला भावी आयुष्यात काम करण्यास प्रेरणा मिळेल. कोल्हापूर महानगरपालिकेत काम केलेमुळे मला विविध विभागाच्या कामकाजाबाबत माहिती झाली. ऑफिस मॅनेजमेंट कशा पध्दतीने केले पाहिजेल याचा फार चांगला अनुभव मला या महापालिकेतून मिळाला आहे. तसेच फक्त ऑफिसमध्ये बसून काम करण्यापेक्षा फिल्डवर्कवर काम करणे, स्वच्छता मोहित राबविणे याबाबत काम करण्याच्या विविध पध्दती शिकलो. स्वच्छता अभियानांमुळे अधिकाऱ्यांशी खेळी मेळीत बोलणे, त्यांच्या कामामध्ये असलेल्या त्रुटी समजून घेणे याचा अनुभव मला आला. मला महापालिकेच्या अनेक विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामामध्ये भरपूर सहकार्य लाभले आहे.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना गेल्या 5 महिन्यात मंगेश शिंदे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना शहरातील कचऱ्याबाबत, स्वच्छतेबाबत दिलेल्या महत्वाची जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडल्या. त्यांनी कोणतेही काम नाकारले नाही ते काम जबाबदारीने व्यवस्थित पार पाडले. कोल्हापूर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून गेले पावणे तीन वर्षे त्यांनी काम पाहिले.
यावेळी मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता एस.के.माने, रमेश मस्कर, आर के जाधव, उपजल अभियंता भास्कर कुंभार, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!