आषाढी वारी सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांना अभिनव फौंडेशन तर्फे औषधांचे किट वाटप . आषाढी वारी पायी सोहळा !!

कांचनवाडी प्रतिनिधी/[ सागर कांबळे ]: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्रेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्तानं कांचनवाडी ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी .
कांचनवाडी व परिसरातील असंख्य वारकरी भाविक हे येतील कांचनवाडी दिंडी क्रमांक १ते ७ .या दिंडीने पायी वारी चे प्रस्थान आज कांचनवाडी येथून झाले.
दिंडी सोहळ्या मध्ये सर्व भाविकांचे आरोग्य चांगले व निरोगी राहाता यावे साठी कांचनवाडी येतील अभिनव फौंडेशन चे अध्यक्ष व गोपाळ- गोविंद सांस्कृतिक भवन मालक डाँ. विष्णूपंत गोपाळ भोसले [साहेब ] तर्फे दिंडी मालक व चालक यांना आरोग्य पूर्ण असे औषीधाचे संपूर्ण किट देण्यात आले.यावेळी अभिनव फौंडेशन चे अध्यक्ष डाँ.विष्णूपंत भोसले, सचिव निवास पाटील सोनाळीकर ,दिनकर पाटील ,डी.के.भोसले ,शिवाजी भोसले,भानुदास भोसले ,विष्णूपंत पाटील ,बाळासो कळेकर व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!