अरुण नरके यांची उर्जा तरुणांना प्रेरणादायी चेअरमन – रविंद्र आपटे.

कोल्हापूर : अरुण नरके हे एक उत्तम खेळाडू आहेत. त्यांच्यातील खिलाडूवृत्तीचे दर्शन ते काम करत असलेल्या सर्वच क्षेत्रात दिसून येते. या माध्यमातून त्यांनी स्वतःला सर्वच बाबतीत तंदुरुस्त ठेवले आहे. यांच्या मन, मस्तिष्क आणि मनगटातील उर्जा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे असे गौरोद्गर गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी काढले. गोकुळ दुध संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची कोल्हापूर जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली या निमित्ताने गोकुळ दुध संघात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले क्रिकेट आणि फुटबॉल या खेळावर निव्वळ प्रेम न करता त्या खेळांच्या पिढ्या घडविण्यासाठी त्यांनी योगदान दिले. ३५ वर्षाहून अधिक काळ आम्ही एकत्र काम करीत आहोत पण वयाच्या ७६ व्या वर्षीचा त्यांच्यातील उत्साह तरुणाईला लाजवणारा आहे. नवनवीन जबाबदाऱ्या ते आनंदाने स्वीकारतात आणि उत्तमपणे पार पाडतात. जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ते कोल्हापूर जिल्ह्यतील क्रीडा क्षेत्राला नवी झळाळी देतील यात शंकाच नाही, त्यांच्या या कामाला गोकुळ परिवाराच्या वतीने शुभेच्छा आहेत.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठन संचालक रणजीतदादा पाटील, विश्वास पाटील (आबाजी), संचालक विश्वास जाधव, बाळासो खाडे, रामराज कुपेकर-देसाई बाबा देसाई,पी.डी.धुंदरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!