ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

मनमानी कारभारामुळे स्वाभीमानीतून अनेक कार्यकर्ते बाहेर

कोल्हापूर/प्रतिनिधी
हातकणंगले मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या राजू शेट्टींना मतदार संघाच्या बाहेरील तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चळवळीसाठी वाहून घेतले होते. परंतु चळवळीचे निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे ,हेतू पुरस्कर वेगळी वागणूक देणे या व असे अनेक आरोप करत चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगड तालुक्यातील स्वाभीमानीपासून फारकत घेत अनेक कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूरात जय शिवराय किसान मोर्चा संघटनेत जाहीर प्रवेश केला.अशी माहिती जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे. मात्र खासदार राजू शेट्टींवर नाराजी व्यक्त करत काही कार्यकर्त्यांनी स्वाभीमानीला काडी मोड देऊन घटनस्थापनेदिवशी नूतन जय शिवराय किसान मोर्चाची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने एकरकमी एफआरपी साठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून मोटरसायकल रँली काढून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी लावून धरल्या. तसेच शेतीपंपास दिवसा १२ तास वीज मिळावी या मागणीसाठी आंदोलन ही करण्यात आले.शिवाय पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर जावून एफ.आर.पी.वरील व्याज देण्यासाठी आर.आर.सी करण्यास भाग पाडले.अल्पावधीतच स्थापन झालेल्या जय शिवराय किसान मोर्चाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चाललेले
काम पाहून चंदगड, आजरा, गडहिंग्लज,आणि भुदरगडतालुक्यातील विजय खवरे,प्रा.सर्जेराव पाटील, बाळासाहेब देवर्डेकर,संजय रेडेकर,धिरज देसाई,रामभाऊ चव्हाण, मुलाजी पाटील, श्रीकांत सावंत,ईश्वर कांबळे, भिमराव बिदरकर,वसंत कांबळे, दिनकर चांदन,आंनदा चव्हाण यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूरात जय शिवराय किसान मोर्चात जाहीर प्रवेश केला. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जय शिवराय किसान मोर्चात प्रवेश केल्याचे सांगितले.यावेळी जय शिवराय किसान मोर्चाची कार्यकारणीही जाहीर करण्यात आली. अध्यक्ष – शिवाजीराव माने,सदाशिव कुलकर्णी(कुंभोज),शिवाजी शिंदे(घुणकी),युवराज आडनाईक(यवलूज),उत्तम पाटील(लाटवडे),भिमराव पाटील(शाहूवाडी),कृष्णात रेगडे(अडकूर),डी.बी.देसाई(म्हसवे),राजेशी पाटील(टोप),प्रवक्ते शामराव पाटील(वाघवे),संघटक दत्ता शिंदे(जयसिंगपूर),सहसंघटक सुनील विणी (बांबवडे).
यावेळी जय शिवराय मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने,धनाजी पाटील,शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी, राजेश पाटील, दत्ता शिंदे, उत्तम पाटील, शामराव पाटील,प्रकाश खाडे,दशरथ निकम,शिवाजी पाटील, युवराज आडनाईक, बंडा पाटील,गोरक्ष पाटील, भिमराव पाटील, सुनील वाणी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *