अपोलोने कोल्हापुरात सादर केली सॅटेलाइट डायग्नोस्टिक लॅब

कोल्हापूर/प्रतिनिधी : अपोलो डायग्नोस्टिक्स या अपोलो हेल्थकेअर अॅण्ड लाइफस्टाइल लिमिटेडच्या भारतातील उदयोन्मुख डायग्नोस्टिक चेनने आज कोल्हापुरात त्यांची नवी सॅटेलाइट लॅब सादर केली. कोल्हापुरात १२०० चौरस फुट जागेत पसरलेली ही नवी लॅब डायग्नोस्टिक पॅथालॉजीमधील आधुनिक पद्धती वापरून ३५०० हून अधिक पॅथालॉजी टेस्ट उपलब्ध करून देईल. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात १० कलेक्शन सेंटर्स सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे, रुग्णांना उत्कृष्ट डायग्नोस्टिक सेवा देणे शक्य होऊ शकेल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी माननीय दौलत देसाई (आयएएस) यांच्या हस्ते शहरातील महत्त्वाचे डॉक्टर्स आणि अपोलो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

अपोलो डायग्नोस्टिक्सतर्फे दरवर्षी ३.५ दशलक्षांहून अधिक उच्च दर्जाच्या निदान चाचण्या केल्या जातात. या डायग्नोस्टिक सेंटर्सची वाढते आणि व्यापक जाळे म्हणजे ग्राहकांना दर्जा, परवडणाऱ्या दरातील हेल्थकेअर उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या मूळ तत्त्वाचेच द्योतक आहे. २०१५ मध्ये १०० हून अधिक अपोलो डायग्नोस्टिक्स सेंटर्स होते. २०१६ मध्ये हा आकडा १५० च्या पुढे जात २५० वर गेला आणि २०१७ मध्ये १ नॅशनल रेफरन्स लॅब, ४ रीजनल रेफरन्स लॅब, ३० हून अधिक सॅटेलाइट लॅब्स आणि २० हून अधिक एचएलएम अशी प्रगती त्यांनी केली. २०१८ मध्ये १ नॅशनल रेफरन्स लॅब, ४ रीजनल रेफरन्स लॅब, ४० हून अधिक सॅटेलाइट लॅब्स, ३० हून अधिक एचएलएम. ५ पेक्षा जास्त आरएलएम अशी आकडेवारी होती आणि २०१९ मध्ये १ नॅशनल रेफरन्स लॅब, ४ रीजनल रेफरन्स लॅब, ४८ हून अधिक सॅटेलाइट लॅब्स, ४५ हून अधिक एचएलएम आणि १० हून अधिक आरएलएम अशी प्रगती करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

या प्रसंगी अपोलो हेल्थ अॅण्ड लाइफस्टाइल लि.चे सीईओ चंद्रशेखर म्हणाले, “अपोलो ग्रुपच्या दर्जेदार सेवांचा पाया असलेल्या ‘सर्वांसाठी चांगले आरोग्य’ या विचारामुळेच अपोलो डायग्नोस्टिक आकाराला आले. विश्लेषण ते निकाल अशा प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाच्या निदानावर अपोलोचा विश्वास आहे आणि अधिक चांगले उपचार आणि रुग्णाची काळजी घेण्यात या भूमिकेचा महत्त्वाचा वाटा आहे. मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमधील रुग्णांनाही उच्च दर्जाच्या निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कोल्हापुरातील आमची नवी सॅटेलाइट लॅब.”

या मताला दुजोरा देताना अपोलो डायग्नोस्टिक्स अॅण्ड डायलीसिसचे सीओओ रविंद्र कुमार म्हणाले, “अपोलो म्हणजेच उत्कृष्टता. परवडणाऱ्या दरात चांगल्या दर्जाची सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे… मग रुग्ण कुठेही असो. अपोलो डायग्नोस्टिक्ससारख्या विश्वासार्ह नावाने कोल्हापुरातील रहिवाशांना हीच सुविधा देण्यात येणार आहे.”

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी माननीय दौलत देसाई (आयएएस) म्हणाले, “अनेक रुग्णांना फायदेशीर ठरेल अशी सॅटेलाइट लॅब कोल्हापुरात सुरू करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!