ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 10 लाखापर्यंतच्या कर्जाला शासनाची हमी जिल्ह्यात 183 जणांना 12 कोटीहून अधिक कर्ज वाटप -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर,दि. 17 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तरुणाना उद्योगासाठी 10 लाखापर्यंतच्या कर्जाची हमी शासनाने घेतली असून या कर्जाचे पाच वर्षापर्यंतचे व्याजही शासन भरणार आहे. या महामंडळामार्फत जिल्ह्यात 3 हजार 200 तरुणांना पात्रता प्रमाणपत्र दिली असून 183 जणांना 12 कोटीहून अधिक कर्ज देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना दिली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सुरु केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, महापौर सरिता मोरे, महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अरुण दुधवडकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक जे.बी.करीम, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सघ्या राष्ट्रीकृत बँकामार्फत कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यापुढील काळात सहकारी बॅंकामार्फतही कर्ज देण्याबाबत शासन पुढाकार घेईल अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरात महामंडळाचे कार्यालय स्थापन केल्यामुळे महामंडळाच्या कामाला निश्चितपणे गती मिळेल तसेच अधिकाधिक तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यातील तरुणांनी या महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यशासनाने राज्यात विकास कामांना गती दिली असून विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही. राज्याचे उत्पन्न वाढले असून जीएसटी, स्टॅम्प आदीव्दारे राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडली असल्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
प्रारंभी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी यांनी स्वागत करुन महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा आणि गट प्रकल्प कर्ज योजनेची माहिती दिली.
कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी.अल्वारिस,पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, उपअभियंता धनंजय भोसले, शाखाअभियंता संतोष पोळ, यांच्यासह माजी महापौर सुनिल कदम, आर.के.पोवार, रामभाऊ फाळके, वसंतराव मुळीक, इद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन मेनन, दिलीप मोहिते, मोहन मुल्हेकर,आनंद माने, उत्तम कांबळे,नगरसेवक सर्वश्री सत्यजित कदम, सुनील कदम , बाबा देसाई, राजसिंह शेळके, किरण नकाते, विवेक महाडिक, धनंजय सावंत, प्रताप सरनाईक, संजय कदम, संजय स्वामी, शरद सामंत, मिलिंद धोंड, विवेक पवार आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *