गोकुळ दुध संघावर जनावरांसह शिवसेनेचा धडक मोर्चा: पालकमत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीनंतर गोकुळ संघाने पशुखाद्याच्या दरात केलेल्या दरवाढी विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आक्रमक होत जिल्हा प्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क येथील गोकुळ दुध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मैंशीच्या डरकाईत मोर्चा काढण्यात आला.
दुध उत्पादन खर्चात वाढ होत आहे. पण दुध दरात वाढ होत नाही.यासंदर्भात अनेक आंदोलने झालीत परंतु गोकुळ प्रशासनाने याची दखल न घेता शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्याच काम केलय.आता तर शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता गोकुळ संघाच्या वतीने दर पोत्याला पशुखाद्याच्या दरात १००रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलल गायीच्या दुधासह तत्सम सरसकट अनुदान दोन वर्षे झाली शेतकऱ्यांना मिळालेल नाही. याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने पितळी गणपती मंदिर येथून गोकुळ दुध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला.मोर्चा गोकुळ संघाच्या कार्यालयावर येताच गोकुळ प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी चक्क जनावरे कार्यालयाच्या गेटलाच बांधलीत.तर संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे उपस्थित नसल्याने त्यांचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान वेगवेगळे फतवे काढून शेतकऱ्यांना जगू द्यायच नाही.अशी भूमिका गोकुळ प्रशासनाची आहे. असा आरोप करत पालकमत्र्यांनी गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून गोकुळवर प्रशासक नेमावा,दुध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करावी अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाया आंदोलकांच्या वतीने विजय देवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
आंदोलना जिल्हा प्रमुख स़ंजय पवार, अवधूत साळुंखे, शुभांगी पोवार, कृष्णात पोवार, शिवाजी जाधव,चंद्रकांत भोसले, दिलीप माने,विनोद खोत प्रकाश पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *