तथाचार्यने ५ वेळा तेनाली रामाचा पाणउतारा करण्‍याचा प्रयत्‍न केला, पण सर्व प्रयत्‍न अयशस्‍वी ठरले

आपली भारतीय संस्‍कृती संपन्‍न प्राचीन गोष्‍टी व दंतकथांनी भरलेली आहे. आपण बालपणापासून या कथा ऐकत-वाचत मोठे झालो आहोत. सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तेनाली रामा’ने अशाच प्रकारची एक पौराणिक गाथा सादर केली आहे, ज्‍यामधून तेनाली रामाची कथा, त्‍याचे जीवन दाखवले जात आहे.

तेनाली रामकृष्‍णा हा विजयनगर साम्राज्‍याचा दिग्‍गज राजा कृष्‍णदेवरायच्‍या दरबारातील सुप्रसिद्ध तेलुगु हास्‍य-कवी आहे. तो राजाच्‍या दरबारातील अष्‍टदिग्‍गजांपैकी (८ सुशिक्षित व्‍यक्‍तींचा समूह) एक आहे. दरबाराचा प्रमुख पुरोहित ऊर्फ राजगुरू असलेला खोडकर तथाचार्य तेनालीचा तिरस्‍कार करण्‍यासाठी ओळखला जातो. राजाकडून सतत मिळत असलेली प्रशंसा आणि दरबारामध्‍ये वाढत असलेल्‍या प्रसिद्धीमुळे तथाचार्य तेनालीचा द्वेष करत असतो. तेनालीचा पाणाउतारा व त्‍याचा अपमान करण्‍यासाठी तथाचार्य नेहमीच तेनालीविरोधात कटकारस्‍थान रचताना आणि त्‍याला विचित्र परिस्थितींमध्‍ये अडकवताना दिसला आहे. एकमेकांचे शत्रू असलेले तथाचार्य व तेनाली प्रेक्षकांसाठी मालिका अधिक लक्षवेधक व रोमांचक करतात. तेनालीची अतुलनीय हुशारी व बुद्धीकौशल्‍याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेताना दिसतात.

चला तर मग काही आठवणींना उजाळा देऊया, जेथे तथाचार्यने तेनालीला हरवण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न केला, पण त्‍याचे प्रयत्‍न अयशस्‍वी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!