ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज कोल्हापूरात .कोल्हापूर आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे .करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेऊन उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस युतीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा 28 मार्चला वर्धा येथे होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. ते नेहमी प्रचाराची सुरवात अंबाबाईच्या दर्शनाने कोल्हापुरातून करायचे .शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची हिच इच्छा असल्याने कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. युतीच्या सभेसाठी तब्बल अडीच लाख लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शहरातील प्रमुख चौकात 10 स्क्रिन लावण्यात येणार आहेत. हि सभा न भुतो न भविष्य ते अशी सभा होणार असल्याचा चंग पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बांधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *