ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

अक्षिता मुद्गलच्या खोड्या काढायला तिचं खरं आणि मालिकेतलं कुटुंब आलं एकत्र ‘भाखरवडी’च्या सेटवर

सोनी सब टीव्हीवरील नवीन विनोदी मालिकेत गायत्रीची भूमिका करणारी अक्षिता मुद्गल सेटवरच्या कलाकार व इतर सर्वांसोबत कामाचा आनंद लुटते आहे. हे सगळेच मदत करणारे आणि कष्टाळु आहेत. कलाकार आणि इतर मंडळी ही जणू तिचं दुसरं कुटुंबच झाली आहेत आणि सेट हे तिचं दुसरं घर. कधीतरी, तिची खरी आई जेव्हा सेटवर येते, तेव्‍हा ती कलाकारांसोबत अधिकच मिसळून जाते. इतर कलाकार आणि तिची आई हे सगळे एकत्र येतात आणि अक्षिताच्या खोड्या काढतात.
आपल्या अनुभवाबद्दल अक्षिता म्हणाली, ”मराठी किंवा गुजरातीमध्ये चांगल्‍याप्रकारे कसं बोलायचं हे माहीत नसलेली सेटवर मी एकमेव व्यक्ती आहे. त्याचा गैरफायदा घेऊन अक्षय (अभिषेक गोखले) आणि परेश सर (महेंद्र ठक्कर) हे आपापल्या भाषेतले काहीतरी अजब अर्थांचे शब्द किंवा वाक्य शिकवतात. ते मला इतरांशी बोलताना ते शब्द किंवा ती वाक्य वापरायलाही लावतात आणि तसं झाल्यानंतर मला त्याचा खरा अर्थ कळतो; जो नेहमीच काहीतरी विचित्र असतो. तसेच, जेव्हा माझी खरी आई सेटवर येते आणि ती त्यांच्यात सामील होऊन ते सगळे मिळून माझी मस्‍करी करतात तेव्हा तर आणखीच गोंधळ उडतो. तरीही या सगळ्यांसोबत काम करताना वेळ खूपच आनंदात जातो आणि त्यांच्यातले सगळेच खूप छान आहेत आणि जेव्हा मदत करण्याची वेळ येते तेव्हा कोणीही मागे हटत नाही. आम्ही जणू एका कुटुंबाचा भागच झालो आहोत आणि भाखरवडी कार्यक्रमाच्या शूटिंगवेळी ही एकत्वाची भावना कायम असते.
भिन्न विचारसरणींच्या दोन कुटुंबांतील कडू-गोड नातेसंबंधांची झलक ‘भाखरवडी’ कार्यक्रमामध्ये बघायला मिळते. गुजराती कुटुंबाचे प्रमुख आहेत महेंद्र ठक्कर (परेश गणात्रा) आणि मराठी कुटुंबाचे प्रमुख आहेत अण्णा (देवेन भोजानी), हे दोघेही भाखरवडीच्या व्यवसायातील परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *