कृषि महोत्सव महोत्सवाची तयारी पूर्ण : शेतकरी-नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

कोल्हापूर: शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या
संयु्क्त विद्यमाने येत्या 18 ते 22 जानेवारीरोजी जिल्हा कृषि महोत्सवाचे इचलकरंजी येथे आयोजन करण्यात
आले असून कृषि महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी
आत येथे बोलतांना दिली.
जिल्हा कृषि महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
केलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, कृषि विकास
अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदिप सुर्वे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे, आत्माच्या उपसंचालक श्रीमती फडतरे, मेडाचे प्रकल्प अधिकारी महेश माघमोडे,
महाबीजचे एन.जी. इनामदार, जलसंधारण अधिकारी बी.के. साठे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे
अधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी येथील हत्ती चौकात योग जिम्नेशियम मैदानावर आयोजित केलेल्या या जिल्हा कृषि
महोत्सवामध्ये 216 स्टॉल्स उभारण्यात येणार असून यामध्ये शासकीय विभागासाठी -40, कृषिनिविष्ठा, कृषि
तंत्रज्ञान व सिंचन-50, कृषि यांत्रिकीकरण-20, गृहपयोगी वस्तू-43, धान्य महोत्सव-28, खादयपदार्थ-21,
सेंद्रीय उत्पादनासाठी -14 स्टॉल्सचा समावेश आहे. तंत्रज्ञान प्रसार दालनामध्ये कृषि व कृषि संलग्न
विभागामार्फत विकसीत केलेले तंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी उपयोगी प्रात्यक्षिके जसे
ठिबक सिंचन,अन्नप्रक्रिया,मूल्यवर्धन, हायड्रोफोनिक्स, कोल्हापूरी गूळ, सेंद्रीय शेती निविष्ठा ,गांडूळ खत,
नाडेफ, ॲक्वाकल्चर, जैवतंत्रज्ञान, सौर उर्जा वापर, दुग्ध व्यवसाय, कृषिविषयक प्रकाशने, हरितगृह,
शेडनेट,पॅकेजींग, साठवणूक इ. च्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार फायदेशीर ठरणार आहे. कृषि महोत्सवामध्ये
सर्व शासकीय विभाग,कृषिविद्यापीठ,कृषि महाविदयालय,कृषि विज्ञान केंद्र,विविध कृषि संशोधन संस्था,बँका
यांचा सहभाग असणार आहे
कृषि महोत्सवामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती या संकल्पनेवर भर दिला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी
अविनाश सुभेदार म्हणाले की, ऊस पिकामध्ये स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा, क्षारपड जमिन सुधारणेसाठी
सबसर फेस ड्रेनेज, बांबूपासून बनविलेली तलम कपडे याबाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहेत. गट
शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना समूह शेतीबाबत मार्गदर्शन होणार आहे. धान्य महोत्सवामध्ये
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामधून दर्जेदार तूरडाळ ,मूगडाळ व उडीदडाळ,बार्शी(सोलापूर)येथून उत्कृष्ठ ज्वारी
(बार्शीशाळू) शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार
आहेत. शेतीसाठी अत्याधुनिक कृषि अवजारे व यंत्रे यांचे प्रर्दशन करुन विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
या कृषि महोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व १०३० सरपंचाना मा. कृषी मंत्री महोदयांनी लेखी
पत्राद्वारे कृषी महोत्सवाचे निमंत्रण दिले आहे. तसेच ग्रामंचायत स्तरावर गावातील नोटीस बोर्डवर तसेच
प्रमुख चौकातील फलकावर पोस्टर प्रदर्शित करुन सर्व शेतकरी बांधवापर्यंत महोत्सवाची माहिती
पोहचविण्यात आलेली आहे. तसेच सुमारे ३ लक्ष हँडबीलद्वारे प्रत्येक शेतक-यांपर्यंत माहिती प्रसारित करण्यात
येत आहे. तसेच बॅनर, फ्लेक्स् आणि प्रसार माध्यमाव्दारेही जिल्ह्यातील शेतक-यांना कृषी महोत्सवाची
माहिती देण्यात येत आहे.
जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन दि. 19 जानेवारी 2019 रोजी राज्याचे कृषि तथा जिल्हयाचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा
शौमिका महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार तसेच मान्यवर लोकप्रतिनीधीं आणि

पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येत असलयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी
सांगितले.
खादय पदार्थ दालनात खादय महोत्सवाच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया व मुल्यवर्धन तंत्राचा वापर
करून महिला बचत गटयांनी खास कोल्हापूरी पध्दतीने बनविलेल्या विविध पाककृतीचा आस्वाद शेतकरी व
नागरीकांना घेता येणार आहे. कृषि महोत्सवामध्ये आयोजित परिसंवादातून कृषि क्षेत्रातील तज्ञांमार्फत
शेतकऱ्यांना कृषि व कृषि संलग्न व्यवसायाविषयी मार्गदर्शन होणार आहे. तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाच्या
माध्यमातून कृषिमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार
आहे.
तरी इचलकरंजी येथे दि. 18 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या जिल्हा कृषि महोत्सवास जिल्हयातील
तसेच नजीकच्या जिल्हयातील शेतकरी, नागरीकांनी भेट देऊन शासकीय कृषि महोत्सव यशस्वी करावा, असे
आवाहनही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!