मुबलक पीक देणाऱ्या सेमिनिज टोमॅटो “अन्सल”चे सांगलीत प्रदर्शन

कोल्हापूर, ८ फेब्रुवारी: सेमिनिज®ने आज आपले मुबलक पीक देणारे टोमॅटो हायब्रिड “अन्सल” महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झालेल्या शेतकरी महामेळाव्यात प्रदर्शनासाठी ठेवले. या महामेळाव्याला उपस्थित असलेल्या २००हून अधिक प्रगतीशील शेतकरी, नर्सरी उत्पादक, किरकोळ विक्रेते (रिटेलर्स) आणि व्यापारी भागीदारांनी या नवीन हायब्रिड बियाण्याच्या लाभांबद्दल जाणून घेतले. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच मुबलक पीक देणाऱ्या सेमिनिज® हायब्रिड बियाण्यांना पसंती दिली आहे. अलीकडेच बाजारात आलेल्या टोमॅटो “अन्सल” हायब्रिड बियाण्यामुळे टणक फळे येतात आणि फळांच्या आकारमानातील एकसमानताही उत्तम असते. याशिवाय टोमॅटो लीफ कर्ल (पाने मुडपणारे) विषाणूंसारख्या आजारांचा सामना अन्सल बियाणी करु शकतात. सेमिनिज®चे प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पंकज रांगे म्हणाले, “अनेक वर्षांच्या संशोधन व विकासातून
आम्ही सेमिनिज®मध्ये त्यांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. या प्रक्रियेत देशभरातील शेतकऱ्यांना सातत्याने सहभागी करून घेत शेतकऱ्यांशी वारंवार संवाद साधत राहिल्याने त्यांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊन श्रेष्ठ दर्जाची बियाणी विकसित करणे आम्हाला शक्य झाले आहे. सेमिनिज® हायब्रिड अन्सल जात सांगलीतील शेतकऱ्यांच्या नेहमीच प्राधान्यक्रमावर राहिली आहे." सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील शेतकरी राकेश कदम म्हणाले, “मी माझ्या शेतात सेमिनिज®ची विविध बियाणी लावली आहेत आणि त्यातून येणाऱ्या पिकामुळे मी खूश आहे. सेमिनिज® हायब्रिड नेहमीच मुबलक आणि एकसारखे पीक देते. शिवाय, सेमिनिज®ची टीम लागवडीमधील अंतर (स्पेसिंग), नर्सरी व्यवस्थापन,कीड व आजार व्यवस्थापन पद्धती यांबद्दल माहिती आम्हाला देते. माझ्या शेतातून उत्तम पीक घेण्यात याची मला खूप मदत झाली आहे.” शेती व पीक व्यवस्थापनाबद्दल कोणतीही मदत मिळवण्यासाठी शेतकरी सेमिनिज® गुरूकूलमसोबत पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात (180030000303). हा क्रमांक सकाळी ७ ते रात्री ९ या काळात सुरू असतो आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळालेले सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह्ज याद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *