महावीर जयंती निमित्त महावीर उद्यान येथे श्रमदान

कोल्हापूर ता.17:- महावीर जयंतीचे निमित्ताने स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान नागाळा पार्क येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरीकांच्यावतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच निसर्ग व आरोग्य याचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी असे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. या मोहिमे अंतर्गत आज सकाळी 7.00 ते 8.00 वाजेपर्यंत महापालिकेच्या महावीर उद्यान येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये महावीर उद्यानाची तसेच बागे सभोवतालची स्वच्छता करणेत आली. यानंतर आडगळीच्या ठिकाणी औषध फवारणी करुन डीडीटी पावडर मारण्यात आली. या माहिमेमध्ये महापालिकेच्या सुमारे 450 हून अधिक अधिकारी/कर्मचा-यांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी महावीर उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित नागरीकांनी शहरातील उद्यानांविषयी बाजू मांडून महापालिकेने अशाच प्रकारे सर्व उद्यानांची स्वच्छता सेवा मोहिम राबवावी व उद्यानांनमधील कमतरतांची पुर्तता करुन घेणेसाठी नागरीकांचीही सहभाग घ्यावा अशी विनंती केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता आर के जाधव, रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबळे, एलबीटी अधिकारी सुनिल बिद्रे, विजय वनकुद्रे, मोठया प्रमाणात अधिकारी, विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आरोग्य सफाई, पवडी, बागा विभागाकडील कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *