ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

२ आणि ३ फेब्रुवारी रोजी शिवाजी स्टेडियमवर रंगणार भिमा फेस्टिव्हल

कलानगरी कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ असणार्या चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भिमा फेस्टिव्हल म्हणजे कलापूरचं प्रसिध्द व्यासपीठ आहे. चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी स्टेडियम इथं २ आणि ३ फेब्रुवारी २०१९ रोजी भिमा फेस्टिव्हल साजरा होणार आहे. त्यातून कोल्हापुरच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
शनिवार दि. २ फेब्रुवारीला सोनी मराठी प्रस्तुत महाराष्ट्राची हास्य जत्रा कोल्हापूर स्पेशल हा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये प्राजक्ता माळी, समिर चौगुले, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अंशुमन विचारे,विशाखा सुभेदार, रसिका वेंगुर्लेकर, अरूण कदम, आदिती शारंगधर, मृण्मयी देशपांडे, प्रसिध्द गायक स्वप्निल बांदोडकर यांच्यासह मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावरील अनेक लोकप्रिय कलाकार कोल्हापूर वासियांना खळखळून हसवणार आहेत. रविवारी ३ फेब्रुवारीला झी टॉकीज प्रस्तुत नाद खुळा कल्ला हा गीत-संगीत- नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होईल. मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, नेहा खान, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे, सुप्रिया पाठारे, सुहास परांजपे, कमलाकर सातपुते, संकर्षण कराडे, श्रेया बुगडे यांच्यासह अनेक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारचा कार्यक्रम सोनी मराठी चॅनलवरून तर रविवारचा कार्यक्रम झी टॉकीजवरून प्रसारीत होणार आहे.
यंदाच्या भिमा फेस्टिव्हलचे प्रायोजक गोकुळ दूध संघ असून हॉटेल वृषाली आणि हॉटेल के ट्री हे हॉस्पीटॅलिटी पाटर्नर आहेत. २ आणि ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक ६.३० वाजता कार्यक्रमांना प्रारंभ होईल. चॅनल बी च्या कैलाश टॉवर्स, असेंब्ली रोड येथील कार्यालयात भिमा फेस्टिव्हलच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. नागरीकांनी शुक्रवार पर्यंत चॅनल बी च्या कार्यालयातून भिमा फेस्टिव्हलच्या मोफत प्रवेशिका घेवून जाव्यात, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक आणि चॅनल बी च्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *