शिवगर्जना फौंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

पन्हाळा/प्रतिनिधी
सातार्डे ता.पन्हाळा येथील शिवगर्जना फौंडेशनच्या वतीने दर वर्षांतून एकदा देण्यात येणारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती शिवगर्जना फौंडेशनचे अध्यक्ष दिंगबर चव्हाण यांनी दिली.
पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथील शिवगर्जना फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम घेतले जातात. तर दोन वर्षातून एकदा उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील साहित्यिकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येतात. दरम्यान
फौंडेशनच्या वतीने २०१९ च्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर एकूण ३८ साहित्यिकांनी आपल्या ५६ साहित्यकृती फौंडेशनकडे पाठवून दिल्या होत्या.यामध्ये यावर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुढील साहित्यिकांची निवड करण्यात आली असून नुकतेच फौंडेशनच्या वतीने पुढील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
बालसाहित्य पुरस्कार- गणेश प्रसाद घुले (औरंगाबाद ), सुंदर माझी शाळा,कथासंग्रह अजित पुरोहित – (सांगली) चौडी, संकीर्ण , सचिन शरद कुसनाळे, (सांगली ) जगा आणि जगू द्या, कविता विभाग राज पांडुरंग शेळके, ( नाशिक), उजेड पेरत जात, कादंबरी विभाग जया जोग(पुणे), शून्य उत्तराची बेरीज , विशेष पुरस्कार- अनुराधा कृष्णा म्हाळशेकर
(गोवा) शब्दफुले हदयीची. या साहित्यकृतीचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक- बाबूराव शिरसाट , रजनीताई हिरळीकर चंद्रकांत निकाडे, साहित्यिक डॉ श्रीकांत पाटील ,पी एस पाटील यांनी केले.
यावेळी परशराम आंबी, संभाजी चौगले कवित्व, तुकाराम शेलार, नवीनचंद्र सणगर, दिगंबर टिपूगडे,अशोक नवरे , बी बी .चौगले, एम बी चौगले, एन टी पाटील, उदयसिंह चोपडे, रमेश वारके, विजय एकशिंगे आनंदा वारके, फौंडेशन उपाध्यक्ष सचिन पाटील, प्रकाश बाऊचकर,अरुण शिंदे संस्थेचे सल्लागार रामदास झेंडे उपस्थित होते. कार्यक्रम तारीख नंतर कळविण्यात येईल पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे बंधनकारक आहे .कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत पुरस्कार कुरियर किंवा पोस्टाने पाठवला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!