ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

रामकिशन ओझा यांना नॅशनल वर्चुअल युनीवर्सिटी फॉर पीस एन्ड एज्युकेशन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

नागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. रामकिशन ओझा यांना दिल्लीच्या नॅशनल वर्चुअल युनीवर्सिटी फॉर पीस एन्ड एज्युकेशन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे.
१० मार्च रोजी दिल्लीच्या इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या पदवीदान सोहळ्यात संघ लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल यांच्या हस्ते रामकिशन ओझा यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. संजीव बन्सल, हेरिटेज एज्येकशन सोसायटीच्या संचालक दीपा कुमार यांच्यासह ओझा यांचे कुटुंबीय उपस्थित होते. श्री. रामकिशन ओझा यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ओझा गेल्या तीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे नागपूरचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीचे अध्यक्ष, भारत सरकारच्या सास्कृंतीक मंत्रालयाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, दूरसंचार आणि रेल्वे विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्य केले आहे.
ही मानद डॉक्टरेट आपण केलेल्या समाजकार्याची पावती आहे. माझ्या मातोश्री स्व. प्रभाताई ओझा यांनी सुरु केलेले समाजसेवेचे काम मी पुढे नेत असून अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करू अशी भावना श्री. रामकिशन ओझा यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *