रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. पाऊस वाढला तर हे धरण फुटण्याची भीती आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.
या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.
हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे.
तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!