पूर ओसरलेल्या भागात महानगरपालिकेच्यावतीने 850 टन कचरा व गाळ गोळा

कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने आज दहाव्या दिवशीही पुर ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहिम सुरु असून आज पंचगंगा तालीम रोड, दुधाळी, जुना बुधवार पेठ, सिध्दार्थनगर, व्हिनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 5 गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, खानविलकर बंगला, धान्य गोडाऊन बावडा, न्यू पॅलेस, कमदवाडी, रिलायन्स मॉल मागे, कामगार चाळ, शिंगणापूर रोड, मस्कुती तलाव, पंचगंगा हॉस्पीटल समोर, बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणच्या संपुर्ण परिसराची स्वच्छता करुन 850 टन कचरा, प्लॅस्टिक व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता केलेनंतर रोगराई पसरु नये यासाठी या परिसरात धुर व औषध फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकण्यात येत आहे. सदरचा गाळ व कचरा 216 टिप्पर, 135 डंपर, 30 आर.सी.गाडया व 30 ट्रॅक्टर ट्रॉलिद्वारे एकूण 411 खेपा करुन 850 टन कचरा व गाळ गोळा करण्यात आला.
यावेळी न्यु कॉलेजचे 30 एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी विद्यार्थीनी, महाविर कॉलेजचे 60 विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी 12 जेसीबी, 15 डंपर, 10 ट्रॅक्टर ट्रॉली, 65 टिप्पर, 2 लोडर, 6 जेट मशिन व महापालिकेच्या 550 सफाई कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम पूर बाधीत क्षेत्रात राबविण्यात आली.
यामध्ये महापालिकेचे 6 जे.सी.बी व 15 डंपर, देवस्थान समितीचे 4 जेसीबी, डी.वाय.पाटील ग्रुपचे 2 लोडर, जेसिपी इंडिया आसोसिएट्स 2 जेसीबीचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे 300 कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे 80 सफाई कर्मचारी, बीव्हीजी कंपनीचे 85 सफाई कर्मचारी, स्वंयसेवी संस्था यांचा समावेश आहे.
सदरची स्वच्छता मोहिमे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरिक्षक श्रीमती शुभांगी पोवार, अरविंद कांबळे, नंदु पाटील, श्रीराज होळकर, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, मुकादम व सफाई कर्मचा-यांनी राबविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!