पूरग्रस्तांना घरे बांधून तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी:संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूरामुळे अनेक घरे उध्दस्त झालीत.तर हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने घरांची पडझड झालेल्या पूरग्रस्तांना घरे बांधून द्यावी.त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळवी.तसेच अशी पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सरकारशी योग्य समन्वय ठेवून अल्लमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा.अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे माणसं, जनावरे ,घरे,शेती ,व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पूरग्रस्त भागातील अनेक घरे पडलेली आहेत.तर ज्या घरात पाणी गेलेल होत ती घरे जीवीतास धोकादायक आहेत. त्यामुळे सरकारने अशा पूरग्रस्तांना घरे बांधून द्यावीत.त्याबरोबर हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.ग्रामीण अर्थव्यवस्था तर शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आवाहन उभे राहिले आहे.तर ऊस, सोयाबीन, भात पिकासह अनेक पिके महापुरामुळे नष्ट झालेली आहेत.अनेक जनावरे दगावली आहेत.तर वाचलेल्या जनावरांच्या खाद्यपदार्थासह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पूरग्रस्त लोकांचीही अवस्था दयनीय बनली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई द्यावी,तसेच विमा कंपन्यांनी पूरग्रस्त भागातील प्रकरणे विनाअवंलब मंजूर करावीत,मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या पुस्तकासह शालेय साहित्य मोफत द्यावेत,ज्या घरात जीवितहानी झाली आहे त्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी,त्याचबरोबर अशी पूरस्थिती पुन्हा निर्माण होवू नये यासाठी शासनाने कर्नाटक सरकारशी योग्य समन्वय ठेवून अल्लमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, एनडीआरएफचे एक पथक कोल्हापूर ला आणावे, ग्रामीण शहरी असा कोणताही भेदभाव न करता मदत मिळावी, कृष्णेचे अतिरिक्त पाणी दुष्काळी सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याकडे वळवावे. अशा मागण्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आल्या.
पत्रकार परिषदेला हिंदूराव पाटील, प्रविण पाटील, चेतन पाटील, शिवाजी खोत,बाबा महाडिक, सोमनाथ जाधव, आर्यन म्हातुगडे यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!