जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी केला अवयव दान करण्याचा संकल्प

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात गारगोटी येथे कार्यक्रमात जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी अवयव दानचा फार्म भरून अवयव दान करण्याचा संकल्प केला.
जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत
दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आला.
सदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.सभापती स्नेहल परीट, पं. स. भुदरगड, श्री. संजय शिंदे, समाजकल्याण अधिकारी, सौ.माधुरी परीट, गटविकास अधिकारी, सौ.रेश्मा राहुल देसाई, जि. प.सदस्य, श्री.जीवन पाटील, जि. प.सदस्य, श्री. अर्जुन अबीटकर, श्री. निंबाळकर, पं. स.सदस्य, सौ. नलवडे, पं. स.सदस्या व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सदर शिबीरमध्ये भुदरगड तालुक्यातील अंध, अस्तिव्यंग, कुष्ठरोगी, कर्णबधिर, मतिमंद मुले, इ. एकूण अंदाजे 1776 दिव्यांग व्यक्ती यांची नोंदणी करण्यात आली. आजची एकूण नोंदणी ११९१झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *