जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीम. आशा उबाळे, यांचे हस्ते फोटो पुजन करणेत आले. यावेळी व्यसनमुक्ती शपथ घेणेत आली. तसेच जिल्हा परिषद परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबविणेत आली.
सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक बी.पी.माळवे यांनी केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमास कक्ष अधिकारी श्री संजय अवघडे, श्री प्रकाश देसाई ,श्री संजय जाधव , श्री रामचंद्र घाग, अधिक्षक श्री दतात्रय केळकर, श्री नारायण चांदेकर व श्री महावीर भिवरे, राजेश चौगुले, सुशांत सुर्यवंशी, प्रशांत नलवडे, विजय पाटील, रणजीत पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!