कोल्हापूरात ना.चंद्रकांतदादा पाटलांचे जल्लोषात स्वागत

कोल्हापूर/प्रतिनिधी
भाजपमध्ये याव म्हणून आम्ही कोणाच्या दारात जात नाही.तर ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे असे राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीचे आमदार मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या वेळेत भेटतात.असा खळबळजनक दावा भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय.
भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांतदादा कोल्हापूरात आले असता भाजपच्या वतीनं त्यांच जल्लोषात स्वागत करण्यात आलं.यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांना रात्री भेटतात असा गौप्यस्फोट केलाय.
महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदाद पाटील यांची नुकतीच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यानंतर ना.चंद्रकांतदादा प्रथमच कोल्हापूरात आले असता ऐतिहासिक दसरा चौकात भाजपच्या वतीने त्यांच फटाक्यांची आतषबाजी करत ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ना.चंद्रकांतदादांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.राजकीय चिंता असणाऱ्या राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांचा रात्रीचा खेळ चालू असून ते मुख्यमंत्र्यांना रात्रीचे भेटतात.असा खळबळजनक दावा केला. तर आमदार हसन मुश्रीफ यांचे कार्य चांगले असून त्यांनी म्हातारे होण्याआधी भाजपमध्ये प्रवेश करावा असे जाहीर निमंत्रणच दिले.
यावेळी उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव,आमदार अमल महाडिक, जि.प.अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, भाजपचे अध्यक्ष राहूल चिकोडे,यांच्यासह भाजपा, विविध तालीम संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *