कोल्हापुरात मोठे आय.टी. पार्क उभारणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लढती ठरल्या आहेत. पण, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधीत उमेदवार कोण? हे गुलदस्त्यातच आहे. युती ठरली असून, कोल्हापूर उत्तरमध्ये भगवाच फडकणार आहे. युतीकडून मीच निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. सत्तेत आल्यानंतर कोल्हापुरात मोठे आय.टी.पार्क उभारु, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. दैवज्ञ बोर्डिंग येथे झालेल्या युवा मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यात “ठरलंय नक्की, हॅट्रीक पक्की” च्या घोषणा देत युवकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना विजयी करण्याचा निर्धार केला.
            यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९८६ मध्ये शिवसेनेची शाखा कोल्हापुरात स्थापन केली. मी त्या दिवशीपासून शिवसेनेत आहे. वयाच्या १९ व्या वर्षी विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख झालो. तेव्हापासून आजपर्यंत गोरगरीबांच्या मुलांना विना डोनेशन अॅडमिशन मिळावी म्हणून झगडतो आहे. तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने मी २०१४ मध्ये २२ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. आंदोलन करून टोल हद्दपार केला. रोजगार मेळावा घेवून ६ हजार युवकांना नोकरी मिळवून दिली. टर्फ मैदान, ओपन जिम या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन दिले. फ्रेन्डशिप डे च्या माध्यमातून युवा वर्गास व्यसनमुक्तीचा संदेश दिला. युवा पिढीला बरबाद करू पाहणाऱ्या अवैद्य धंद्याविरोधात रान उठवले. युवकांच्या प्रत्तेक प्रश्नावर आवाज उठविला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षित युवक आज बेरोजगारीमुळे इतर शहरांची वाट धरत असून, कोल्हापूरातच मोठे आय.टी.पार्क उभे करून युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत युवकांची शक्ती पाठीशी असल्यानेच आपला विजय निश्चित असल्याचेही सांगितले.
            यावेळी ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, चेतन शिंदे, सौरभ कुलकर्णी, विनय क्षीरसागर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
            यावेळी *युवा सेनेचे योगेश चौगुले, अविनाश कामते, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, अक्षय बोडके, गुरु लाड, शैलेश साळोखे, अक्षय कुंभार, अजिंक्य पाटील, प्रसाद पोवार, विश्वजित चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!